Ad will apear here
Next
मुलांनी घेतला भात लावणीचा अनुभव

पुणे : वारजे येथील ‘श्री प्रल्हादराव काशिद फाउंडेशन’च्या मातोश्री नॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी मुळशी येथे भात लावणीचा अनुभव घेतला. या विद्यार्थ्यांनी नुकतीच कातवडी गावाला भेट दिली आणि तेथील भातशेतीत स्वतः भात लावणी केली. या शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून मुलांना ग्रामीण भागातील लोकांचे व शेतकऱ्यांचे जीवनमान जवळून अनुभवास मिळाले. वेगवेगळी धान्ये, पिके, ती पिकवण्यासाठी लागणारे हवामान इत्यादीबाबत सविस्तर माहिती घेता आली. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारे ज्ञान मुलांसाठी उपयुक्त ठरते, या जाणीवेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.   

शाळेचे विश्वस्त धनंजय काशिद, शिक्षिका प्रीती खर्जे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. वैभव उभे, वैशाली ताकवले  व ऐश्वर्या खाडे हे शिक्षकही यात सहभागी झाले होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZGNCC
Similar Posts
बँक ऑफ बडोदातर्फे किसान पंधरवड्याचे आयोजन पुणे : बँक ऑफ बडोदाने शेतकऱ्यांसाठी एक ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान बडोदा किसान पंधरवड्याचे आयोजन केले असून, त्याअंतर्गत शेती क्षेत्रातील कर्जाचे प्रमाण वाढवण्याचा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश आहे,’ अशी माहिती बँकेच्या पुणे परिमंडळाचे प्रमुख के. के. चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली
‘किसान’ कृषी प्रदर्शन १२ डिसेंबरपासून मोशीमध्ये पुणे : ‘देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ येत्या १२ ते १६ डिसेंबर दरम्यान मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील’,अशी माहिती आयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली
राजगडाच्या पायथ्याशी मिळणार शेतकऱ्याच्या घरात राहण्याचा आनंद पुणे : खेडेगाव, शेती, शेतकरी याविषयी शहरी भागातील लोकांना कुतूहल असते. शहरी वातावरणापासून दूर, अस्सल गावरान आणि मोकळ्या हवेचा आनंद घेण्यासाठी शहरातील मंडळी आसुसलेली असतात. आता राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावात हा आनंद अनुभवता येणार आहे.
कर्जमाफीबाबतच्या तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय समिती पुणे : राज्यशासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या शेतकरी कर्जमाफी योजनेबाबतीतल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी नोंदविण्यासाठी या समितीकडे संपर्क करावा, असे आवाहन सहकार आयुक्तालयाने केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language